InformativeTechnologyशैक्षणिक

चार्ल्स बाबेज यांना संगणकाचे जनक असे का म्हणतात?

बातमी Share करा:

चार्ल्स बाबेज यांना संगणकाचे जनक असे का म्हणतात?

आजचे आपण संगणक, मोबाईल अशी अनेक गणिती प्रक्रिया करणारे, माहिती पुरवणारे वेगवेगळे उपकरणे वापरतो याची संकल्पना सुमारे 200 वर्षांपूर्वी चार्ल्स बाबेज यांनी मांडली होती. म्हणून चार्लस  बाबेज यांना संगणकाचे जनक असे संबोधले जाते.

विश्लेषणात्मक इंजिन (Analytical Engine)

साधारणपणे 1830 च्या दशकात चार्लस बाबेज हे गणित विषयातील तज्ञ व संशोधक होते यांनी साधारणपणे 1830 ते  1835 च्या दरम्यान विश्लेषणात्मक इंजिन Analytical engine नावाची मशीन निर्माण केली होती त्या मशीनच्या आधारे वेगवेगळे गणिती कॅल्क्युलेशन सोडवता येतील अशी त्यामध्ये तरतूद होती काही अपरिहार्य कारणामुळे ते मशीन पूर्ण विकसित झाले नाही.

संकल्पना

आज आपण गणिती प्रक्रिया करण्यासाठी जे कॅल्क्युलेटर वापरतो त्यामध्ये त्या पद्धतीतील इनपुट माहिती दिल्यानंतर कॅल्क्युलेटर त्यावर प्रक्रिया करून आपणास योग्य उत्तर देते ही इनपुट प्रोसेस आउटपुट (Input –Process – Output) ची मूळ संकल्पना चार्ल्स बाबेज यांनी त्यावेळी मांडली होती. आणि आज सुमारे 200 वर्षानंतर देखील त्याच संकल्पनेवर संगणकाची डेव्हलपमेंट चाल आहे. इनपुट प्रोसेस आउटपुट  (Input -process –output) ही संकल्पना वापरून ऑटोमॅटिक कॅल्क्युलेशन ची संकल्पना सुरुवातीस उदयास आणल्या कारणामुळे चार्लस बाबेज यांना संगणकाचे जनक असे म्हणतात.

विश्लेषणात्मक इंजिन  Analytical engine मध्ये इनपुट आउटपुट साठी कोणती गोष्ट वापरली होती?

चार्लस बाबेज यांनी विश्लेषणात्मक इंजिन (Analatical engine) डेव्हलप केले त्यावेळेस टेक्नॉलॉजी इतकी सुधारित नव्हती त्यामुळे त्यांना बऱ्याच अडचणी येत होत्या. त्यातून त्यांनी मार्ग काढत पंच कार्डचा वापर करून संगणकामध्ये इनपुट व आउटपुट देवाण-घेवाण ची संकल्पना आखली.

 

विश्लेषणात्मक इंजिन (Analatical engine) चे काम पूर्णत्वाला का गेले नाही /पूर्ण का झाले नाही

साधारणपणे 1830 च्या दरम्यान चार्लस बाबेज यांनी विश्लेषणात्मक इंजिन Analatical engine नावाचे एक मशीन विकसित केले ज्यामध्ये इनपुट दिल्यानंतर प्रोसेस होऊन आउटपुट मिळेल परंतु त्यामध्ये काही टेक्निकल कारणामुळे म्हणजे त्यावेळी टेक्नॉलॉजी एवढी विकसित नव्हती त्या कारणामुळे सपोर्टिंग डिव्हायस विकसित करणे खूप कठीण जात होते. तसेच त्या वेळेच्या गव्हर्मेंटनी त्यांना पाहिजे तेवढी या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट केली नाही, त्या आर्थिक कारणामुळे हे मशीन डेव्हलप होऊ शकले नाही.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!