जुना लॅपटॉप फास्ट करण्याची सोपी ट्रिक
जुना लॅपटॉप फास्ट करण्याची सोपी ट्रिक
आपला लॅपटॉप जुना झाला, की आपण बऱ्याचदा तो विकतो, किंवा इतरांना देऊन टाकतो. त्याचा वापर करत नाही, आणि नवीन लॅपटॉप खरेदी करतो,
यामुळे आपले नुकसानच होते, पहा जुन्या लॅपटॉप ला किंमत येत नाही आणि नवीन लॅपटॉप ची किंमत जास्त असते. आपल्या लॅपटॉप चा म्हणजेच जुन्या लॅपटॉप चा स्पीड वाढवण्यासाठी एक सोपी आणि त्यातल्या त्यात स्वस्त पद्धत सांगतो.
नेमकं काय करायचं?
जुन्या लॅपटॉप मधील डीव्हीडी किंवा सीडी राईटर असेल तर तो काढून त्या जागी एस. एस. डी. म्हणजे (सॉलिड स्टेट ड्राईव्ह ) बसवणे आणि त्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम आणि एप्लीकेशन पॅकेजेस तसेच इतर काही महत्त्वाचे ॲप्लिकेशन्स इन्स्टॉल करणे आणि आपल्या बॅकअप फाईल्स व इतर स्टोरेज मटेरियल लॅपटॉप मध्ये असलेल्या एच डी डी म्हणजेच (हार्ड डिस्क ड्राइव्ह मध्ये ) साठवणे.
याने काय होईल?
हार्ड डिस्क मध्ये डिस्क आणि रेड राईट हेडर असतात. तर एस एस सी डी मध्ये सेमीकंडक्टर चिप्स असतात त्यामुळे आलेली माहिती लगेच साठवून ठेवतात यामुळे एसएसडी चा स्पीड हा हार्ड डिस्क च्या तुलनेमध्ये जास्त असतो. म्हणून लॅपटॉप चा स्पीड वाढतो.
हे करण्यासाठी खर्च किती?
साधारणपणे तुम्ही एस एस डी किती जीबी ची लावता त्यावर अवलंबून आहे परंतु ढोबळमानाने सांगितले तर 3500/- ते 4500/- दरम्यान अंदाजे खर्च येईल.
जुन्या आणि नवीन लॅपटॉप च्या किमती मधील फरक जर पाहिला तर हे नक्कीच परवडण्यासारखा आहे.

