चॅट जीपीटी आपणास माहित आहे का?
चॅट जीपीटी आपणास माहित आहे काय
चॅट जीपीटी चा सुलभपणे कसा वापर करायचा
जाणून घ्या चॅट जी पी टी चे महत्व आणि उपयोग
चॅट जी पी टी (ChatGPT) हे ओपन ए आय (OpenAI) द्वारे तयार केलेल्या भाषा मॉडेलच्या जनरेटिव्ह प्री-ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर 3.5 (GPT-3.5) चा भाग आहे. हे विविध भाषा समजून घेण्यासाठी तयार केलेले आहे, वापरकर्त्याच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देने आणि विविध विषयांवर माहिती सादर करणे. असा उपयोग चॅट जी पी टी चा होतो. हे जानेवारी २०२२ पर्यंत अद्ययावत (Updated) आहे.
1) हे मानवासारखा मजकूर समजण्यास आणि तयार करण्यास सक्षम आहे. कारण यामध्ये ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चरवर बनवलेले GPT-3.5 हे 175 अब्ज पॅरामीटर्ससह सखोल न्यूरल नेटवर्कचा वापर झाला आहे.
2) हे वापरकर्त्याचे प्रश्न समजून घेणे, त्या अनुशंघाने सुसंगत प्रतिसाद सादर करणे आणि नैसर्गिक भाषेतील विविध कार्ये हाताळण्यास सक्षम आहे, ज्यामुळे ते संभाषणात्मक प्रभावी माध्यम बनत आहे.
3) हे ॲप्लिकेशन एक अष्टपैलू एप्लीकेशन आहे जे वेगवेगळ्या कार्यामध्ये संभाषण करण्याचे काम करण्याची क्षमता ठेवते. जसे की आणि बरेच काही.
4) याच्या प्री ट्रेनिंग आणि फाईन ट्युनिंग या दोन प्रक्रिया आहेत यामध्ये इंटरनेटच्या मजकूरातून फ्री ट्रेनिंग घेत असतो तर माहितीचे प्रदर्शन करण्यासाठीची तयारी ही फाईन ट्युनिंग मध्ये असते
5) OpenAI ने यूजर इंटरफेसद्वारे वापरकर्त्यांना कोणत्याही प्रश्नावर सुरक्षितपणे फीडबॅक देण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. हे चुकीची किंवा निरर्थक उत्तरे देऊ शकते, संधीद्ध प्रश्न किंवा एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ निघत असल्यास प्रश्नाचे उत्तर देण्यास थोडेसे कमकुवत ठरते इनपुट वाक्यांशासाठी शब्दशः असू शकते. ते नेहमी स्पष्टीकरणासाठी विचारू शकत नाही. ChatGPT ला मर्यादा आहेत.