पद्धतशीरपणे अभ्यास करण्यासाठी हे करा
पद्धतशीरपणे तुम्हाला चांगला अभ्यास करण्यात मदत करण्यासाठी येथे काही सल्ला देत आहोत.
-
प्रथम एक वेळा पत्रक तयार करणे गरजेचे आहे
तुमच्या शाळेच्या वेळा व इतर कामांसाठी वेळ काढून एक वेळा पत्रक तयार करणे गरजेचे आहे अभ्यास करताना मध्ये मध्ये गॅप ठेवून त्यामध्ये काही तरी करमणुकीचे किंवा मनविरंगुळा होईल अशा गोष्टीसाठी वेळ देणे गरजेचे आहे.
-
अभ्यासासाठी शांत प्रकाशमय जागेची निवड करा. तुमचे लक्ष विचलित होणार नाही अशा वस्तू किंवा गोष्टी तुमच्या पासून दूर ठेवा.
-
साधारणपणे 15 मिनिटे अभ्यास करून 5 मिनिटांचा ब्रेक घ्या यामध्ये 15 मिनिटांमध्ये एक प्रश्न वाचून त्याचा सराव करून, पाठ करा व नंतर 5 मिनिटांचा ब्रेक घ्या. असे तीनदा करा, म्हणजे सलग एक तास अभ्यास होईल.
-
गरज असेल तेव्हा शिक्षक विद्यार्थीमित्र किंवा ऑनलाईन स्पष्टीकरण विचारा अभ्यासू मित्रांचा एक ग्रुप बनवा व त्यामधून आपल्या शंकांचे समाधान करा.
-
एका दिवसात किती प्रश्न पाठ करायचे किंवा किती चाप्टर पूर्ण करायचे याचे ध्येय सेट करा आणि ते पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करा.
-
वेळोवेळी सराव परीक्षा घेऊन स्वतःच पेपर तपासून स्वतः योग्य-अयोग्य ओळखून त्यावर लक्ष केंद्रित करून ती सुधारण्याचा प्रयत्न करा.
-
केलेल्या अभ्यासासाठी टाईम टेबल मध्ये एखादा दिवस किंवा दररोज एखादा तास उजळणी करण्यासाठी ठेवा.
-
वेगवेगळ्या शिक्षण पद्धतीचा उपयोग करून एखादा विषय जास्तीत जास्त समजून घ्या.
-
महत्वाचे म्हणजे निरोगी रहा पूर्ण झोप घ्या भरपूर पाणी प्या आवश्यक तेवढे खा.